शिरसोलीत पंधरा दिवसांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:17 IST2021-05-20T04:17:53+5:302021-05-20T04:17:53+5:30

शिरसोली : येथे पत्नीच्या निधनानंतर पतीचाही पंधरा दिवसांनी मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बुधवारी झाली. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याने ...

Husband and wife died at Shirsoli fifteen days apart | शिरसोलीत पंधरा दिवसांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू

शिरसोलीत पंधरा दिवसांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू

शिरसोली : येथे पत्नीच्या निधनानंतर पतीचाही पंधरा दिवसांनी मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बुधवारी झाली. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिरसोली येथील शेतकरी नारायण बारी व त्यांच्या पत्नी भारती बारी यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना २९ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचार सुरू असताना भारती बारी यांचा ३ मे रोजी मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूची माहिती पती नारायण यांना सांगण्यात आली नव्हती. दरम्यान, नारायण यांनी पत्नीची चौकशी केली असता त्यांना त्या दुसऱ्या वॉर्डात उपचार घेत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांना पुन्हा श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यात १९ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मुलगा जयेश, मुलगी स्नेहल आणि हर्षाली असा परिवार आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा जयेश याच्यावर फक्त २२व्या वर्षी दोन्ही लहान बहिणींची जबाबदारी आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Husband and wife died at Shirsoli fifteen days apart