छेड काढणाऱ्या शेकडो जणांच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:21 IST2021-09-16T04:21:19+5:302021-09-16T04:21:19+5:30
कॉलेज कट्टा असो किंवा उद्यान, तलाव या भागात मुली व महिलांची छेड काढणाऱ्या शेकडो रोडरोमिओंवर वर्षभरात कारवाया करण्यात आल्या ...

छेड काढणाऱ्या शेकडो जणांच्या मुसक्या आवळल्या
कॉलेज कट्टा असो किंवा उद्यान, तलाव या भागात मुली व महिलांची छेड काढणाऱ्या शेकडो रोडरोमिओंवर वर्षभरात कारवाया करण्यात आल्या आहेत. सध्या कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने तेथील संख्या घटली आहे; परंतु मेहरुण तलाव, उद्यान परिसरात अशा घटना सातत्याने घडतात. निर्भया व दामिनी पथकाकडून अशा भागांत सतत गस्त घातली जाते.
कोणी छेड काढत असेल तर येथे संपर्क करा
फक्त महिलांच्या सुरक्षेसाठी ९८६०५०१०९१, तर ९४२२२१०७१० क्रमांकावर व्हॉटस्ॲपसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याशिवाय ११२, ०२५७-२२२३३३३ या क्रमांकावर संपर्क केल्यास तत्काळ दामिनी व निर्भया पथकाची मदत मिळेल. हे क्रमांक नियंत्रण कक्षात उपलब्ध असून, तेथे २४ तास यंत्रणा कार्यान्वित असते.
दामिनी पथक काय करते?
दामिनी पथकाची मुख्य जबाबदारी मुली व महिलांच्या सुरक्षेची आहे. जेथे जेथे महिलांची छेड काढली जात असेल, महिलांना असुरक्षित वाटत असेल या भागात दामिनी व निर्भया पथकांनी गस्त घालणे अपेक्षित आहे. दामिनी पथकात सध्या ९ महिला असून, त्यांच्याकडे तीन दुचाकी देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय निर्भया पथकाला चारचाकी वाहन देण्यात आले असून, चालकासह तीन महिला कर्मचारी नियुक्त आहेत. दोन्ही पथकाच्या प्रमुख म्हणून सहायक फौजदार मंजुळा तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दामिनी पथकात मनुष्यबळ व वाहनांची कमतरता आहे.
कोट...
महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी व निर्भया पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या दोन्ही पथकांनी शहरात विशेष करून महिलांची गर्दी असलेल्या ठिकाणी गस्त घातली जाते. शहरात दिवसभरात दोन शिफ्टमध्ये या पथकाकडून गस्त घातली जाते. टवाळखोर, गुन्हेगार व रोडरोमिओ यांच्यावर वचक बसावा म्हणून या पथकाची निर्मिती झाली आहे. या पथकामुळे टवाळखोरांवर वचक बसला आहे.
-चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक