हटकर समाज मंडळाची बळीराजाप्रती माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 19:35 IST2017-08-20T19:32:19+5:302017-08-20T19:35:45+5:30

शिरसोली येथील शेतकºयांना बैल पोळ्याच्या साहित्याचे वितरण

Human Rights to the People's Party | हटकर समाज मंडळाची बळीराजाप्रती माणुसकी

हटकर समाज मंडळाची बळीराजाप्रती माणुसकी

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२०-तालुक्यातील शिरसोली येथील हटकर समाज प्रगती मंडळातर्फे बळीराजाप्रती माणुसकी जोपासत शिरसोली प्र.न.ग्रामपंचायतीसमोर एका कार्यक्रमाद्वारे बैल पोळ्याच्या साहित्याचे वितरण  करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. शेतात पिके करपली आहे. हंगाम हातातून जाण्याची स्थिती असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. वर्षभर आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणाºया बैलाचा सण असलेला पोळा सण साजरा कसा करायचा असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. त्या अनुशंगाने हटकर समाज प्रगती मंडळातर्फे ११ शेतकºयांना बैलाचा साज देण्यात आला.

यावेळी सरपंच अर्जुन काटोले, ग्रा.पं.सदस्य अनिल पाटील, उपसरपंच प्रणय सोनवणे, माजी उपसरपंच शेनफडू पाटील, माजी सरपंच अनिल महारू पाटील यांच्यासह हटकर समाज प्रगती मंडळाचे सदस्य उपस्थित होते. 

Web Title: Human Rights to the People's Party