संबध नाही तर सागर कुटुंबीयांसोबत कसा?

By Admin | Updated: October 19, 2015 00:45 IST2015-10-19T00:45:03+5:302015-10-19T00:45:03+5:30

खडसे कुटुंबीय व सागर चौधरी यांचे कार्यक्रमांमधील फोटो सोशल मीडियावर झळकले. सागर चौधरी याची महसूलमंत्री खडसे आणि आमदार जगवाणी यांच्याप्रती असलेल्या निष्ठेवरून संमिश्र प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत.

How do you relate to the Sagar family? | संबध नाही तर सागर कुटुंबीयांसोबत कसा?

संबध नाही तर सागर कुटुंबीयांसोबत कसा?

जळगाव : वाळू ठेकेदार सागर चौधरी याच्याबाबत महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी आपला कोणताही संबध नाही, असे म्हटल्यानंतर रविवारी खडसे कुटुंबीय व सागर चौधरी यांचे अनेक कार्यक्रमांमधील फोटो सोशल मीडियावर विविध ग्रुपमध्ये झळकले. सागर चौधरी याची महसूलमंत्री खडसे आणि आमदार गुरुमुख जगवाणी यांच्याप्रती असलेल्या निष्ठेवरून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत.

गुरुनाथच्या वाढदिवसाला हजेरी

एकनाथराव खडसे यांचा नातू गुरुनाथच्या वाढदिवस कार्यक्रमात कोण शिरलाय हा अनोळखी पाहुणा? अशी पोस्ट सोशल मीडियावर पडली. त्यासोबत वाढदिवसाचा फोटो व त्यात सागर चौधरी व राजेश मिश्रा हा वाळू ठेकेदार तसेच जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व त्यांचे पती हे सुद्धा छायाचित्रात दिसत आहेत.

चौधरी व मिश्रा हे वाढदिवसानिमित्त महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना शुभेच्छा देताना फोटो सोशल मीडियावर आहे. रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमाचा फोटोही व्हायरल झाला आहे. त्यात आमदार गुरुमुख जगवानी, नगरसेवक सुनील माळी, सागर चौधरी हे दिसत आहेत. तर डॉ.गुरुमुख जगवाणी यांना शुभेच्छा देतांनाचा सागर चौधरी याचा फोटो देखील टाकण्यात आला आहे.

प्रिती शर्मा-मेनन यांनी केले टि¦¦ट केले आहे. या टि¦टवर तिघांनी आक्रमक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. खडसे यांच्याशी संबध नाही तर कौटुंबीक कार्यक्रमांमध्ये सागर चौधरी यांची आवजरुन उपस्थिती कशी? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आला आहे.

आम आदमी पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा प्रिती शर्मा- मेनन यांनी खडसे यांच्या नातवाच्या वाढदिवसाचा फोटो टाकून टि

 

Web Title: How do you relate to the Sagar family?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.