शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे आवास योजना लाभार्थी सर्वेक्षण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:50 IST

प्रत्येकाला स्वत:चे घर असावे अशी इच्छा असते. त्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाला घर, पाणी, गॅस ही धोरणे सरकारने ठरविली आहेत. त्या योजनांचा लाभ स्थानिक जनतेला करुन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच अंतर्गत प्रभाग क्रमांक आठमध्ये आवास योजना लाभार्थी सर्वेक्षण कार्यक्रम राबविला जात असल्याचे आ.संजय सावकारे यांनी सांगितले.

ठळक मुद्देघरकुल योजनांचे लाभार्थी सर्वेक्षण करण्यात येवून कुटुंब प्रमुखांना टोकन देण्यात येणारप्रभागातील भारत नगर, महात्माफुले नगरातील बहुतांश नागरिक योजनेचे लाभार्थी

भुसावळ, जि.जळगाव : प्रत्येकाला स्वत:चे घर असावे अशी इच्छा असते. त्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाला घर, पाणी, गॅस ही धोरणे सरकारने ठरविली आहेत. त्या योजनांचा लाभ स्थानिक जनतेला करुन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच अंतर्गत प्रभाग क्रमांक आठमध्ये आवास योजना लाभार्थी सर्वेक्षण कार्यक्रम राबविला जात असल्याचे आ.संजय सावकारे यांनी सांगितले.येथील लोणारी मंगल कार्यालयात शुक्रवारी प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी सर्वेक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.व्यासपिठावर नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, गटनेता मुन्ना तेली, नगरसेवक किरण कोलते, अमोल इंगळे, राजेंद्र नाटकर, सतीष सपकाळे, नगरसेवक युवराज लोणारी, किशोर पाटील, भाजपा महिला शहराध्यक्षा मीना लोणारी, माजी नगरसेवक दीपक धांडे, देवा वाणी, उपमुख्याधिकारी देशपांडे, नगर अभियंता पंकज उन्हाळे, प्रधानमंत्री आवास योजना मार्गदर्शक हिरालाल कोळी, प्रकल्प सल्लगार चेतन सोनार उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वालन करण्यात आले.नगराध्यक्ष रमण भोळे यांनी शहरातील लाभार्र्थींना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आमाचा प्रयत्न आहे. सरकारी योजना आणता येतात. मात्र त्या पूर्ण करण्याची तळमळ असली तर जनतेसाठी योजना राबविली जाते. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी योजनांचा आलेला निधी परत नेण्याची वेळ आणली आहे. तसेच ४०० घरकुलांची योजना न्यायालयीन प्रक्रियेत अडकून ठेवली आहे.प्रास्ताविकात नगरसेवक युवराज लोणारी यांनी, प्रभागातील भारत नगर, महात्माफुले नगरातील बहुतांश नागरिक योजनेचे लाभार्थी आहेत. घरकुल योजनांचे लाभार्थी सर्वेक्षण करण्यात येवून कुटुंब प्रमुखांना टोकन देण्यात येणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, प्रकल्प सल्लागार चेतन सोनार यांनी योजनेबाबत लाभार्र्थींना माहिती दिली. यावेळी प्रभागातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शांताराम पाटील यांनी केले. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ