पावसामुळे कोसळले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 22:41 IST2020-07-18T22:41:04+5:302020-07-18T22:41:13+5:30

खोलसर येथील घटना । सुदैवाने जीवित हानी नाही

The house collapsed due to rain | पावसामुळे कोसळले घर

पावसामुळे कोसळले घर


पारोळा : तालुक्यातील खोलसर येथे पावसामुळे एक घर कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
दिनांक १६ व १७ रोजी तालुक्यात मुसळधार तसेच रिपरिप पावसाने हजेरी लावली. त्यात रावण सादु सोनवणे खोलसर यांचे मातीचे घराचे ४ चष्म्याच्या घराच्या भिंतीत पाणी मुरल्याने ते कोसळले. सुदैवाने घरातील सर्व जण शेतात कामाला गेले होते. घरी कोणीच नव्हते यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र घरातील संसारोपयोगी वस्तू मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेल्याने े १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. घरासह एकूण ६० ते ६५ हजारांचे नुकसान रावण सोनवणे यांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: The house collapsed due to rain