उंदराने केला मांजर आणि बिबटय़ाचा ‘गेम’

By Admin | Updated: October 1, 2015 00:08 IST2015-10-01T00:08:15+5:302015-10-01T00:08:15+5:30

शिंदखेडा : खलाणे शिवारातील शेतात बुधवारी सकाळी बिबटय़ा मृतावस्थेत आढळून आला. बिबटय़ाने शिकार केलेल्या रानमांजराच्या पोटात असलेल्या उंदराने खाल्लेल्या विषारी पदार्थामुळे झाल्याचा अंदाज आहे.

Hottie 'cat' cat and leopard 'game' | उंदराने केला मांजर आणि बिबटय़ाचा ‘गेम’

उंदराने केला मांजर आणि बिबटय़ाचा ‘गेम’

शिंदखेडा : तालुक्यातील खलाणे शिवारातील कपाशीच्या शेतात बुधवारी सकाळी साडेचार फूट लांबीचा चार वर्ष वयाचा बिबटय़ा मृतावस्थेत आढळून आला. बिबटय़ाचा जीव त्याने शिकार केलेल्या रानमांजराच्या पोटात असलेल्या उंदराने खाल्लेल्या काही तरी विषारी पदार्थामुळे झाल्याचा वनअधिका:यांचा प्राथमिक अंदाज आहे.

खलाणे शिवारात लताबाई कांतीलाल माळी यांचे शेत आहे. शेतात कपाशीची लागवड केली आहे. बुधवारी सकाळी शिवारातील अन्य शेतातील बाजरी कापणीसाठी शेतमजूर जात असताना त्यांना लताबाई यांच्या शेतात बिबटय़ा झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. बिबटय़ाला पाहून शेतमजूर गावाकडे पळत सुटले. त्यांनी गावात जाऊन बिबटय़ाची माहिती दिली. तेव्हा गावातील पोलीस पाटील यांनी वनविभागास दूरध्वनीवरून कळविले. तेव्हा वनक्षेत्रपाल पी.ए.पाटील हे सहकारी ए.के. पाटील, मुनाफ पटेल यांना घेऊन सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शेतात पोहचले. त्यांनी लांबून आवाज करून बिबटय़ा काही हालचाल करतो का हे पाहिले. काहीच हालचाल होत नसल्याने बिबटय़ा मृतावस्थेत पडला असल्याची खात्री झाली.

त्यांनी तातडीने पशुधन विकास अधिकारी डॉ. बी.टी. देसले, डॉ. एम.बी. चौधरी, डॉ.दीपक राजपूत आणि डॉ.संजय भिसे यांच्या पथकाला त्याठिकाणी पाचारण केले. त्यांनी मृत बिबटय़ाचे विच्छेदन करून पंचनामा केला.

मृत बिबटय़ावर अंत्यसंस्कार

मृत बिबटय़ाच्या मृतदेहावर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, बिबटय़ाचा व्हिसेरा तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती वनअधिका:यांनी दिली.

शिकार पचली नाही

शवविच्छेदनात बिबटय़ाने रानमांजरीची शिकार केली, तर मांजरीने उंदीर खाल्ल्याचे आढळले. त्या उंदराने काही विषारी पदार्थ सेवन केला असेल. त्याचे विष शरीरात पसरल्याने बिबटय़ाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिका:यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Hottie 'cat' cat and leopard 'game'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.