हॉटेल मालकाने दम भरताच चोरट्याकडून रक्कम परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 19:18 IST2019-04-25T19:17:50+5:302019-04-25T19:18:56+5:30
जामनेर शहरात सतत चोरी आणि घरफोडीच्या घटना घडत आहेत. कोणीही गावाला गेले म्हणजे चोरट्यांनी त्या घराला लक्ष करून चोरी केलीच पाहिजे, असा प्रकार येथे नित्याची बाब झाली आहे. बसस्थानकदेखील असुरक्षित आहे.

हॉटेल मालकाने दम भरताच चोरट्याकडून रक्कम परत
जामनेर : आठवडे बाजारातील नागदेवता भोजनालयात बुधवारी रात्री चोरट्याने केलेल्या चोरीच्या घटनेत हॉटेल मालकाने दम भरताच त्याने रक्कम परत केली.
चोरट्याने हजार रुपये व सीसीटीव्ही कॅमेरा लांबविला. चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. दुकान मालकाने संशयित अरशद शेख याला दम भरल्यानंतर आठ तासात त्याने रोकड व कॅमेरा परत केला.
सैन्यातून निवृत्त झालेल्या किशोर पाटील यांचे नागदेवता भोजनालय आहे. या ठिकाणी ही चोरीची घटना पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली. त्यांनी सकाळी दुकान उघडल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसले.
दरम्यान, पाटील यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता शहरातच राहणारा अरशद शेख चोरी करत असल्याचे दिसले. त्याच्याशी संपर्क साधत पाटील यांनी त्याला मी फौजी आहे. दुकानातील चोरीची रक्कम व कॅमेरा परत कर असे धमकाविले. अरशद याने रक्कम कॅमेरा परत केला.
पोलिसात घटनेची नोंद घेतली असल्याची माहिती देण्यात आली.