मनपा रुग्णालयाचे डॉक्टर सहाच्या आत गायब

By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:04+5:302015-12-05T09:07:04+5:30

जळगाव : शहरवासीयांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टर ‘ओपीडी’ ची वेळ संपण्याच्या आतच गायब होत असल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले.

Hospital doctor's doctor disappeared | मनपा रुग्णालयाचे डॉक्टर सहाच्या आत गायब

मनपा रुग्णालयाचे डॉक्टर सहाच्या आत गायब

जळगाव : शहरवासीयांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टर ओपीडी

ची वेळ संपण्याच्या आतच गायब होत असल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. मनपाच्या सर्वात मोठय़ा छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात तर डॉक्टर बैठकीत असल्याने रुग्ण बाहेर ताटकळत बसल्याचे दिसून आले. इतर रुग्णालयांमध्ये तर संध्याकाळी सहा वाजण्याच्या आत डॉक्टर गायब होते.

मनपाच्या रुग्णालयांमध्ये

ओपीडीच्या वेळी डॉक्टर गायब असल्याच्या तक्रारी लोकमतकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस स्टिंग ऑपरेशन केले असता संध्याकाळी ओपीडीची वेळ संपण्याच्या आत डॉक्टर गायब असल्याचे दिसून आले. त्याचा हा लाईव्ह रिपोर्ट’..

सकाळ व दुपारची स्थिती

सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत चालणा:या ओपीडीच्या वेळेत सकाळी व दुपारी केवळ नानीबाई अग्रवाल रुग्णलायात डॉक्टर नव्हते. उर्वरित इतर रुग्णालयांमध्ये डॉक्टर हजर होते.

नानीबाई रुग्णालयाचे अधिकारी दौ:यावर

नानीबाई रुग्णालयाचे डॉक्टर नागपूरहून आलेल्या वरिष्ठ अधिका:यांसोबत दौ:यावर असल्याचे सांगण्यात आले. येथे रुग्ण नव्हते मात्र रुग्ण आल्यावर चेतनदास मेहता रुग्णालयाचे एक डॉक्टर येथे येऊन रुग्णांची तपासणी करीत होते, असे दिसून आले.

Web Title: Hospital doctor's doctor disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.