शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

भीषण! स्कूल बसखाली चिरडून ५५ वर्षीय व्यक्ती ठार; चालक झाला पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 23:15 IST

फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Bhusaval Accident: यावल तालुक्यातील अकलूद येथे शुक्रवारी सकाळी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या बसच्या धडकेत ५५ वर्षीय इसम ठार झाला. हा अपघात मयत पंडित बादशाह पहेलवान ढब्याजवळ चालक बस मागे घेत असताना घडला. घटनेनंतर या घटनेची माहिती फैजपूर पोलिसांना देण्यात आल्यावर मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अकलूद, ता. यावल या गावाजवळ पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे. शुक्रवारी सकाळी या स्कूलची बस (एमएच २१/ बीएच ०६१३) घेऊन चालक हा गावाजवळील पहेलवान यांच्या ढाब्यासमोर होता. बस मागे घेत SCHOOL BUS 613 असताना या बसची धडक लागल्याने पंडित मोहन बादशाह (५५, रा. कासवे) हे जागीच ठार झाले. ते दाढी- कटींग करायला आले होते. या अपघातानंतर चालक घाबरून बस सोडून तेथून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली व तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी बस घेतली ताब्यात 

फैजपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रभाकर चौधरी, हवलदार विकास सोनवणे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. पंचनामा करून बसदेखील ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी पाडळसा पोलिस पाटील सुरेश खैरनार यांच्या खबरीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहेत. 

टॅग्स :BhusawalभुसावळAccidentअपघात