उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या तिकीट परीक्षकांचा भुसावळ येथे सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:19 PM2018-12-17T23:19:53+5:302018-12-17T23:24:30+5:30

भुसावळ विभागातील नोव्हेंबर महिन्यामध्ये दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणाºया ३७ तिकीट परीक्षकांचा डीआरएम कार्यालयातील सभागृहात सत्कार करण्यात आला.

Honoring the Ticket Examiner Completed in Bhusawal | उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या तिकीट परीक्षकांचा भुसावळ येथे सन्मान

उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या तिकीट परीक्षकांचा भुसावळ येथे सन्मान

Next
ठळक मुद्देडीआरएम आर.के.यादव यांच्याहस्ते झाला सत्कारयापुढेही असेच प्रशंसनीय कार्य करण्याचा दिला सत्कारातून संदेश

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ विभागातील नोव्हेंबर महिन्यामध्ये दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणाºया ३७ तिकीट परीक्षकांचा डीआरएम कार्यालयातील सभागृहात सत्कार करण्यात आला. डीआरएम आर.के.यादव, एडीआरएम मनोज सिन्हा, सीनियर डीसीएम सुनील मिश्रा यांच्याहस्ते हा कार्यक्रम सोमवारी झाला.
नोव्हेंबर महिन्यात भुसावळ विभागातील ३७ पैकी २७ भुसावळ, ५- मनमाड, ४- खंडवाच्या तिकीट परीक्षकांनी ४.५७ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण केले. भुसावळचे तिकीट परीक्षक मंगेश पाठक, रंजीत शर्मा, निसार खान, अनिल खर्चे, शेख जावेद, अरुण कुमार मिश्रा, ए.के.गुप्ता, मो.अब्दुल्ला, रमाशंकर, पी.एम.पाटील, एस.पी.मालपुरे, ए.एम.खान, मुन्ना कुमार श्रीवास्तव, मोहम्मद रफीक लाडजी, आर.के.केसरी, एस.एम.पुराणिक, शेख अल्ताफ, एम.पी. नजाकर, वी.बी शिंदे, पी.एच.पाटील, राजपाल सिंह, एस.एन.खान , अमित शर्मा, पीयूष कुमार, एस.के.दुबे, महबूब जंगलू, आर.के.गुप्ता, विनय ओझा, बी.पी.सिंह या भुसावळातील तिकीट परीक्षकांना उद्दिष्ट पूर्ण केल्याने सन्मानित करण्यात आले.

Web Title: Honoring the Ticket Examiner Completed in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.