बालकाचा जीव वाचवणाऱ्या क्रीडा शिक्षकाचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST2021-09-15T04:22:20+5:302021-09-15T04:22:20+5:30
भुसावळ : तापी नदीपात्रात बालकाचा जीव वाचवणारे येथील संत गाडगेबाबा हिंदी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक एन. एन. पाचपांडे ...

बालकाचा जीव वाचवणाऱ्या क्रीडा शिक्षकाचा सन्मान
भुसावळ : तापी नदीपात्रात बालकाचा जीव वाचवणारे येथील संत गाडगेबाबा हिंदी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक एन. एन. पाचपांडे यांचा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ जळगाव जिल्हा व पंचायत समिती, शिक्षण विभाग भुसावळ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
१२ रोजी गणेश विसर्जन करत असताना तापी नदीवर एन. एन पाचपांडे यांना नदीपात्रात बुडत असलेला आर्यन यादव बचाव बचावचा मदतकार्यासाठी ओरडत असताना दिसला. क्षणाचाही विलंब न करता व जीवाची पर्वा न करता ५७ वर्षीय पाचपांडे यांनी नदीत उडी घेत आर्यन यादवला बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.
सत्कारप्रसंगी गटविकास अधिकारी विलास भाटकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी बी. डी. धाडी, विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, तुषार प्रधान, माजी सभापती सुनील महाजन, ना.गो. पाटील, सदानंद उन्हाळे, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्रदीप साखरे, प्राचार्य एन. बी. किरंगे, प्राचार्य व्ही. एस. पाठक, क्रीडा शिक्षक व उपमुख्याध्यापक रमण भोळे, तालुका समन्वयक बी. एन. पाटील, प्रमोद शुक्ला, विलास पाटील, एम. के. वाणी, डी. आर. धांडे, आनंद पाठक, सुनील वर्मा, कांतीलाल कुलकर्णी, अनिल माळी, आर. सी. चौधरी आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते.