जवानांचा सत्कार हा देशभक्ती जोपासणारा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST2021-08-17T04:23:04+5:302021-08-17T04:23:04+5:30
के. डी. चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे विश्वस्त माजी अध्यक्ष संजय कौतिक चौधरी, पोलीस पाटील, स्वातंत्र सैनिकांच्या विधवा ...

जवानांचा सत्कार हा देशभक्ती जोपासणारा कार्यक्रम
के. डी. चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे विश्वस्त माजी अध्यक्ष संजय कौतिक चौधरी, पोलीस पाटील, स्वातंत्र सैनिकांच्या विधवा पत्नी पार्वताबाई डुमन चौधरी, गोपीचंद महाराज, ह. भ. प. विजय महाराज देवरे, नेरकर यांचाही सत्कार करण्यात आला.
सीमेवर तैनात मनीष संजय थोरात या जवानाच्या माता मीना थोरात व पिता संजय थोरात यांचा सत्कार केला. सैनिक चेतन पांडुरंग चौधरी यांचा सत्कार त्यांचे पिता पांडुरंग बाबूराव चौधरी यांनी स्वीकारला. यावेळी कैलास रामदास मराठे, पितांबर पाटील, कैलास नवल बोरसे, प्रभाकर फकीरा माळी, वामनराव बाबूराव चौधरी, रमेश चंदू पाटील, गणेश गुलाब चौधरी, महेश नवनीत मराठे या आजी-माजी जवानांचा त्यांच्या परिवारासह त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. एस. टी. महामंडळातील उमेश मोतीलाल चौधरी व विनोद गुलाब चौधरी यांचाही सत्कार झाला.