कजगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:19 IST2021-08-14T04:19:51+5:302021-08-14T04:19:51+5:30

कजगाव, ता. भडगाव : जवळजवळ १८ महिन्यांनंतर ग्रामीण भागातील शाळांची घंटा वाजली. यात दहावी- बारावीच्या परीक्षेत यश संपादन ...

Honoring meritorious students at Kajgaon | कजगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

कजगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

कजगाव, ता. भडगाव : जवळजवळ १८ महिन्यांनंतर ग्रामीण भागातील शाळांची घंटा वाजली. यात दहावी- बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ब.ज. हिरण विद्यालयात सन्मान करण्यात आला.

अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष दिनकरराव पाटील होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महात्मा गांधी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मंगेश पाटील, सचिव रत्ना पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

दहावीच्या वर्गातून प्रथम आलेली चैतन्या मनोज पाटील, द्वितीय क्रमांकाने आलेल्या साक्षी प्रदीप पाटील, तृतीय क्रमांकाने आलेल्या साक्षी परमेश्वर पाटील व मिलिंद अशोक महाजन व बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या रिंकू विजय पाटील, द्वितीय लक्ष्मी विजय साठे व तृतीय प्रशांत अशोक सोनवणे यांचा सन्मान केला.

मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे ज्येष्ठ संचालक धर्मसिंग पाटील, स्वप्नील पाटील, सुनील पाटील, गुणवंतांचे पालक उपस्थित होते. आभार एस.एस. केदार यांनी मानले.

Web Title: Honoring meritorious students at Kajgaon