अंतुर्ली येथे ज्येष्ठांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:18 IST2021-08-22T04:18:25+5:302021-08-22T04:18:25+5:30
अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर : गावातील विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार ‘माझं गाव माझी संकल्पना’ या संकल्पनेतून ...

अंतुर्ली येथे ज्येष्ठांचा सन्मान
अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर : गावातील विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार ‘माझं गाव माझी संकल्पना’ या संकल्पनेतून जळगाव आकाशवाणी केंद्राचे अधिकारी सतीश पप्पू व स्मिता दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन भास्कर देव यांनी केले होते.
गावातील वयाने सर्वात जास्त असलेले ज्येष्ठ नागरिक कल्याण पाटील, तर महिलांमध्ये सर्वात वयोवृद्ध महिला कासाबाई भोई, निवृत्त सुरक्षारक्षक तुळशीराम तराळ, सैन्यात कार्यरत असलेले प्रभाकर सोनवणे, ज्येष्ठ समाजसेवक एस.ए. भोई, उद्योजक विशाल महाजन व दुकान शेख, शेतकरी पुरुषोत्तम वंजारी, कोरोनायोद्धा डॉ. दिलीप बोरसे, परिसरातील सरपंच व उपसरपंच यांचाही सत्कार करण्यात आला. गजानन देशपांडे परतवाडा, दिनेश पाटील, मोहन महाजन अतिथी होते.
यावेळी हि.फ. तराळ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘माझं गाव माझी संकल्पना’ या विषयावर गावाचा झालेला विकास व गावातील समस्या याविषयी मनोगत व्यक्त केले.
दीपप्रज्वलन भावना देव यांनी, तर प्रतिमापूजन मनोहर देव यांनी केले. सूत्रसंचालन वैभव देव यांनी केले.