शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हनी ट्रॅप प्रकरणात आंटीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 22:26 IST

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी षडयंत्र रचणा-या आंटीसह, मनोज वाणी व एक ...

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी षडयंत्र रचणा-या आंटीसह, मनोज वाणी व एक अनोळखी व्यक्ती अशा तिघांविरुद्ध मंगळवारी रात्री जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक पाटील यांनीच फिर्याद दिली. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात दिवसभर काथ्याकूट सरु होता, शेवटी रात्री ९.३० वाजेचा मुहूर्त गवसला.काय आहे अभिषेक यांची फिर्यादअभिषेक पाटील यांच्या रिंग रोड वरील कार्यालयात १६ रोजी सकाळी ११.३० वाजता एक महिला आली. तेव्हा अभिषेक पाटील व प्रशांत राजपूत असे दोघे होते. मला तुमच्याशी एकट्यात बोलायचं आहे, असे सांगितले असता पाटील यांनी राजपूत यांना दरवाजाजवळ पाठविले. त्यावेळी ही महिला म्हणाली, तुम्ही खूप छान राजकीय काम करत आहात, तरी मी कुठल्याही पद्धतीने तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करु इच्छित नाही, त्यावेळी पाटील यांनी विचारले की, तुम्ही काय काम करतात, त्यावर या महिलेने सांगितले की, मी मोठ्या लोकांना शारीरिक संबंधासाठी मुली पुरविण्याचे काम करते. तुमच्याकडे पण मला मनोज वाणी नामक व्यक्तीने काही ॲडव्हान्स पैसे देऊन एका मुलीमार्फत तुमचे अश्लील फोटो व व्हीडिओ बनवून पाहिजे किंवा तसे न झाल्यास एखाद्या मुलीमार्फत बलात्कार किंवा विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन जेणेकरून अभिषेक पाटील यांचे राजकीय जीवन संपवून जाईल असे सांगितले. यावेळी महिलेच्या मोबाईलमध्ये मनोज वाणी याने पाठविलेला अभिषेक यांचा फोटो व मोबाईल क्रमांक होता, असे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यामुळे मनोज वाणी, ती महिला व एक अनोळखी व्यक्ती अशा तिघांसह यांना मदत करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला.असे आहेत कलम व व्याख्याकलम      व्याख्या१२० ब : अपराधिक षडयंत्र२९४ : अश्लील कृती व गाणी४१७ : ठकवणूक करणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव