मेहरुणमध्ये घरफोडी करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:16 IST2021-04-02T04:16:35+5:302021-04-02T04:16:35+5:30

जळगाव : मेहरुणमधील गणेशपुरीत घरफोडी करणाऱ्या रईसखान हमीदखान ऊर्फ लाला (वय २५,रा. मेहरुण) याला एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी अटक केली. ...

Home burglar arrested in Mehrun | मेहरुणमध्ये घरफोडी करणाऱ्यास अटक

मेहरुणमध्ये घरफोडी करणाऱ्यास अटक

जळगाव : मेहरुणमधील गणेशपुरीत घरफोडी करणाऱ्या रईसखान हमीदखान ऊर्फ लाला (वय २५,रा. मेहरुण) याला एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली.

१६ ऑक्टोबर रोजी रात्री खिडकीची जाळी तोडून हारुन मुसा पटेल (वय ६०) यांच्या घरातील कपाटातील २५ हजारांची सोन्याची पोत, २० हजारांच्या दोन अंगठ्या व २० हजारांची रोख रक्कम असा ऐवज लंपास झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करीत असताना रईसखान हमीदखान ऊर्फ लाला हा निष्पन्न झाला होता. लाला हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध शहरातील पोलीस ठाण्यांसह भुसावळ रेल्वे पोलिसांत जबरी गुन्हे दाखल असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

चार दिवसांची पोलीस कोठडी

संशयित रईसखान हमीदखान ऊर्फ लाला याला दुपारी न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास सहायक फौजदार अतुल वंजारी व सदानंद नाईक हे करीत आहेत.

Web Title: Home burglar arrested in Mehrun