भौतिकतेच्या मागे न धावता मानवी मूल्ये धारण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:46+5:302021-02-05T05:53:46+5:30

‘‘मनुष्य भौतिकतेच्या मागे लागण्यापेक्षा मानवी मूल्यांचा अंगीकार करेल तर जीवन सुंदर होईल’’ कोरोना महामारीने आपल्याला अनेक धडे शिकविले आहेत. ...

Hold human values without running after materialism | भौतिकतेच्या मागे न धावता मानवी मूल्ये धारण करा

भौतिकतेच्या मागे न धावता मानवी मूल्ये धारण करा

‘‘मनुष्य भौतिकतेच्या मागे लागण्यापेक्षा मानवी मूल्यांचा अंगीकार करेल तर जीवन सुंदर होईल’’ कोरोना महामारीने आपल्याला अनेक धडे शिकविले आहेत. समस्त मानवमात्रांचे दैनंदिन जीवन अस्ताव्यस्त करून टाकले. याचा प्रभाव कुणी सकारात्मक तर कुणी नकारात्मक ग्रहण केला. भौतिक दृष्टीने विचार केला तर अनेकांकडे आलिशान घरे, महागड्या गाड्या, भरपूर साधन- संपत्ती होती. परंतु लॉकडाउननंतर सर्व काही एकाच जागेवरच राहिले. त्यामुळे या साधनांचा लाभ घेता आला नाही. पुरातन काळापासून संतांनी हेच समजावले, की आपण भौतिक मायेला इतके अधिक महत्त्व देऊ नये की तेच सर्वस्व आहे. खरंतर ही माया केवळ भ्रम आहे. मायेचा सदुपयोग करून आपण आपल्या कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. संतांनी नेहमी प्रेम, नम्रता, करुणा, दया यासारख्या मानवी मूल्यांना महत्त्व दिले. लॉकडाउन काळात जेव्हा आपण सर्व घरात होतो, तेव्हा ज्या घरांमध्ये अगोदरपासून प्रेमाचे वातावरण होते. तिथे या परिस्थितीचा नकारात्मक प्रभाव जाणवला नाही. उलट हेच मानले, की नेहमीच्या कामाच्या व्यापात आपण कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हतो, पण या परिस्थितीमध्ये एकमेकांना वेळ देता आला आणि आधीची प्रेमळ नाती आणखी घट्ट झाली. 'विश्व बंधुत्व' आणि 'भिंतीरहीत जग' हा भाव मनामध्ये बाळगून गरजूंना त्या सर्व गोष्टी मागणी करण्यापूर्वीच पोहचविण्याचा प्रयत्न केला ज्यांची गरज होती. या परिस्थितीने हे सिद्ध केले की मानवता हाच खरा धर्म आहे व लॉकडाउनने आमच्या मनाला ही प्रेरणा दिलीकी, आपण एकजुटीने सर्वांना द्यायचे आहे. शेवटी सत्याचा आधार घेऊन जीवनात स्थिरता प्राप्त करावी. आपण जगाशी एकत्वाची भावना प्रस्थापित करावी. आपण खऱ्या अर्थाने मनुष्य आहोत तर मानवतेच्या दिव्य गुणांचा अंगिकार करून प्रेमच करीत जावे, कारण पुढे हाच एकमेव मार्ग आहे.

-संत निरंकारी मंडळ शाखा जळगाव

Web Title: Hold human values without running after materialism