चारचाकीची रिक्षाला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:19 IST2021-09-03T04:19:04+5:302021-09-03T04:19:04+5:30

भरत हा रिक्षाचालक होता. जामनेर येथे भाड्याच्या घरात कुटुंबीयांसोबत वास्तव्याला होता. सुनील शार्दुल हा फर्निचरचे काम करतो. गुरुवारी फर्निचरचे ...

Hit a four-wheeler rickshaw; One killed | चारचाकीची रिक्षाला धडक; एक ठार

चारचाकीची रिक्षाला धडक; एक ठार

भरत हा रिक्षाचालक होता. जामनेर येथे भाड्याच्या घरात कुटुंबीयांसोबत वास्तव्याला होता. सुनील शार्दुल हा फर्निचरचे काम करतो. गुरुवारी फर्निचरचे साहित्य घेण्यासाठी भरतची रिक्षा घेऊन दोघे जण जळगावला आले होते. एक लाख रुपयांचे साहित्य घेतल्यानंतर सायंकाळी जामनेर येथे जात असताना उमाळा गावाजवळ भरधाव चारचाकीने रिक्षाला मागून धडक दिली. त्यात रिक्षाने रस्त्यावरच चार वेळा पलटी घेतली. त्यात भरत हा फुटलेल्या काचातून रस्त्यावर पडला. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सुनील हा गंभीर जखमी झाला. दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविल्यावर भरतला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, जखमी सुनीलने चारचाकीची तुटलेली नंबर प्लेटच सोबत आणली होती. चारचाकीचालक फरार झालेला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Web Title: Hit a four-wheeler rickshaw; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.