27 रोजी जळगावात हिंदू एकता दिंडी
By Admin | Updated: May 16, 2017 13:40 IST2017-05-16T13:40:25+5:302017-05-16T13:40:25+5:30
याच पाश्र्वभूमीवर जळगाव शहरातील हिंदू जनजागृती समितीतर्फे 27 मे रोजी सायंकाळी पाच वाजता हिंदू एकता दिंडी काढण्यात येणार

27 रोजी जळगावात हिंदू एकता दिंडी
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 16 - सनातन संस्थेचे संस्थापक गुरू डॉ़ जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभरात हिंदू राष्ट्र जागृती अभियान राबविण्यात येत असून याअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पाश्र्वभूमीवर जळगाव शहरातील हिंदू जनजागृती समितीतर्फे 27 मे रोजी सायंकाळी पाच वाजता हिंदू एकता दिंडी काढण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली़
या वेळी सनातनचे नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीचे मुंबई येथील प्रशांत जुवेकर, ह.भ.प. वरसाडेकर महाराज व राजश्री देशपांडे यांची उपस्थिती होती़ 27 मे रोजी नेहरू चौकातून सायंकाळी 5 वाजता हिंदू एकता दिंडीला सुरुवात होईल. रेल्वेस्टेशन, पत्री हनुमान मंदिर, शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे शिवतीर्थ मैदानावर दिंडींचा समारोप होईल.
या अभियानांतर्गत हिंदू जनजागृती समितीतर्फे जळगाव, धुळे, नंदुरबार आणि ब:हाणपूर येथे ‘साधना आणि हिंदू राष्ट्राची आवश्यकता’ या विषयांवर 33 व्याख्याने, 36 मंदिरांची सामूहिक स्वच्छता, 9 ठिकाणी धर्मजागृती सभा तसेच युवा शौर्य जागरण शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली.