यावल महाविद्यालयात हिंदी भाषा दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:21 IST2021-09-16T04:21:48+5:302021-09-16T04:21:48+5:30
यावल : जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभाग व ...

यावल महाविद्यालयात हिंदी भाषा दिवस साजरा
यावल : जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभाग व कला मंडळातर्फे हिंदी दिवस ऑनलाइन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी निवृत्त शिक्षक जे.आर. शेख यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी डॉ. सुधा खराटे होत्या. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
सुरुवातीला अरुण सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख मार्गदर्शक जे.आर. शेख यांनी कार्यक्रमात 'हिंदी की दशा और दिशा' या विषयावर विचार व्यक्त केले. दूरदर्शन, सिनेमा आणि जाहिरात यांचे हिंदी भाषेचे प्रचार-प्रसारात महत्त्वाचे योगदान आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन अरुण सोनवणे यांनी केले, तर आभार सी.के पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. एम डी. खैरनार, प्रा. ए. पी. पाटील, संजय पाटील व डॉ. पी.व्ही. पावरा तसेच शिक्षकांनी सहकार्य केले.