महामार्ग सहापदरी होणार
By Admin | Updated: October 15, 2015 00:29 IST2015-10-15T00:29:10+5:302015-10-15T00:29:10+5:30
जळगाव : जळगाव ते भुसावळ या दरम्यान सहापदरी महामार्गाला मंजुरीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या वृत्तास खासदार रक्षा खडसे यांनी दुजोरा दिला आहे.

महामार्ग सहापदरी होणार
जळगाव : अमरावती ते नवापूर महामार्ग चौपदरीकरणासाठी दोन वेळा निविदा काढल्यानंतरदेखील प्रतिसाद न मिळाल्याने आता तिस:यांदा निविदा काढण्यात येणार असून जळगाव ते भुसावळ या दरम्यान सहापदरी महामार्गाला मंजुरीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या वृत्तास खासदार रक्षा खडसे यांनी दुजोरा दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे चौपदरीकरणाच्या कामासाठी दोन वेळेस निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र, एकाही ठेकेदाराने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता तिस:यांदा निविदा काढण्यात येणार असल्याचे नहीचे प्रकल्पप्रमुख व्ही.जे.चमारगोरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. जळगाव-भुसावळ मार्गावर सहापदरीसाठी हालचाली जळगाव ते भुसावळ या मार्गावर सर्वाधिक रहदारी आहे. या मार्गावर अपघाताचे प्रमाणदेखील जास्त भुसावळ ते जळगाव सहापदरी मार्ग व्हावा यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हा मार्ग तयार करताना येणा:या तांत्रिक अडचणींबाबत अभ्यास केला जात आहे. तसेच अमरावती ते नवापूर या चौपदरीकरणासाठी नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. या कामाला थोडा विलंब होत असला तरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते तयार करण्यावर भर राहणार आहे. -रक्षा खडसे, खासदार. भुसावळ-जळगाव या मार्गाच्या सहापदरीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. मंजुरीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. -व्ही.जे.चमारगोरे, प्रकल्पप्रमुख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.