महामार्गाने घेतला पुन्हा बळी
By Admin | Updated: April 15, 2017 00:42 IST2017-04-15T00:42:17+5:302017-04-15T00:42:17+5:30
डंपरची धडक : नोकरीच्या पहिल्याच दिवशी काळाची झडप

महामार्गाने घेतला पुन्हा बळी
जळगाव : घरी जेमतेम शेती़़़ वृत्तपत्राची एजन्सी सांभाळून वडिलांना उदरनिर्वाहात हातभार लावत होता़ 15 दिवसांपूर्वी जळगावातील बॉश कंपनीत मुलाखत दिली़ ऑपरेटर म्हणून निवड झाली़ अन् शुकवारी कंपनीत रूजूही झाला़ मात्र नोकरीचा हा आनंद फार काळ टिकला नाही़ घरी पोहण्यापूर्वीच हेमंत भास्कर दोडे (वय 24 रा़ गोजोरे ता़भुसावळ) हा तरूण राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचा बळी ठरला़ दुचाकीला भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी दुपारी 4़30 वाजेच्या सुमारास पोदार इंटरनॅशनल स्कूलनजीक घडली़
अन् नियतीने डाव साधला
मित्रांकडून त्याला बॉश कंपनीत रिक्त जागा असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार त्याने 15 दिवसांपूर्वीच बॉश कंपनीत मुलाखत दिली होती़ मुलाखतीत पात्र होवून निवड झाल्याबाबत गुरूवारी हेमंतला कंपनीकडून कळविण्यात आले होत़े त्यानुसार कंपनीत रूजू होण्यासाठी हेमंत शुक्रवारी गोजोरे येथून दुचाकीने (क्ऱएम़एच़19 सीबी 8164) शुक्रवारी सकाळी जळगावला आला होता़ कंपनीत रूजू झाला़ यानंतर त्याला कंपनीचे ओळखपत्र, गणवेश तसेच चष्मा, बुट असे साहित्य मिळाल़े नोकरी व त्याबरोबरच कंपनीचे साहित्य मिळाल्याच्या आनंदात हेमंत घराकडे परतत होता़ घरी जावून आई, वडीलांना नोकरी लागल्याचे कळविणार त्यापूर्वीच नियतीने डाव साधला़