हायमास्टचा झगमगाट पुन्हा ‘बंद’
By Admin | Updated: October 24, 2015 00:15 IST2015-10-24T00:15:25+5:302015-10-24T00:15:25+5:30
महापालिकेने लावलेले हायमास्ट दिवे बंद करण्याचे आयुक्त डॉ़ नामदेव भोसले दिले आहेत.

हायमास्टचा झगमगाट पुन्हा ‘बंद’
धुळे : शहरातील बहुसंख्य चौकात महापालिकेतर्फे हायमास्ट, सोडिअम वेफरचे दिवे लावण्यात आले आहेत़ त्यातून होणारी विजेची उधळपट्टी थांबविण्यासाठी हे सर्व दिवे बंद करण्याचे आदेश आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी पारित केले आहेत़ त्यामुळे महापालिकेची किमान 3 ते 4 लाखांची बचत होणार असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागातील सूत्रांनी दिली़ दरम्यान, मागेही आयुक्तांनी हे हायमास्ट दिवे बंद करण्याचे आदेश दिले होते. नंतर ते सुरू करण्यात आले होते. आता मंगळवारपासून हायमास्ट पुन्हा बंद होणार आह़े चार महिन्यांपूर्वीची स्थिती शहरात विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या पथदिव्यांसह हायमास्ट दिव्यांच्या बिलापोटी 14 लाख 10 हजार 490 रुपये बिल आले होत़े त्यानंतर मे महिन्यामध्ये 10 लाख 92 हजार 531 इतके बिल आल़े पर्यायाने अनावश्यक दिवे बंद केल्यामुळे 3 लाख 17 हजार 959 रुपये वाचविण्यात प्रशासनाला यश आले आह़े पर्यायाने बिलात फरक पडला आह़े