स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर स्टेशनवर हाय अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:19 IST2021-08-15T04:19:54+5:302021-08-15T04:19:54+5:30
मेहरूण परिसरात झाडांची वृक्षतोड जळगाव : शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलाव परिसरात वृक्षतोडीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत ...

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर स्टेशनवर हाय अलर्ट
मेहरूण परिसरात झाडांची वृक्षतोड
जळगाव : शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलाव परिसरात वृक्षतोडीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. विशेष म्हणजे दिवसा बिनधास्त पणे वृक्ष तोडीच्या घटना घडत आहेत. याबाबत तक्रार करूनही मनपा प्रशासनातर्फे दखल घेण्यात येत नसल्यामुळे, नागरिकांमधुन तीव्र नाराजी होत आहे. त्यामुळे येथील नैसर्गीक संपदा टिकण्यासाठी मनपा प्रशासनाने तलाव परिसरात सुरक्षारक्षक नियुक्त करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींमधुन व्यक्त केली जात आहे.
खासदारांनी घेतली रेल्वे बोर्डाच्या चेअरमन यांची भेट
जळगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून अनेक पॅसेंजर बंद आहेत. तसेच चाकरमान्यांना मासिक पासही बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजून खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. तरी प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने पॅसेंजर सेवा सुरू करण्यासह मासिक पास देण्याबाबत खासदार उन्मेश पाटील यांनी दिल्ली येथे रेल्वे बोर्डाचे चेअरमन सुनीत शर्मा यांची भेट घेतली.