शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 21:12 IST

कवयित्री बहिणाबाई चाैधरींची पुण्यतिथी साजरी : विद्यार्थ्यांनी सादर केल्या कविता

जळगाव - अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर...आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर.., यासह विविध कवितांचे सादरीकरण करीत शाळा, महाविद्यालय तसेच सामाजिक संस्थांच्यावतीने खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणातून बहिणाबाईंच्या जीवन कार्याची माहिती देवून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

बहिणाबाई चौधरी यांचे काव्य म्हणजे जीवन जगण्याचे तत्वज्ञान

बहिणाबाई चौधरी यांचे काव्य म्हणजे जीवन जगण्याचे तत्वज्ञान, असे प्रतिपादन केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक राणे यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी निमित्ताने ऑनलाइन काव्यवाचनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी, डॉ. स्वाती चव्हाण आदी उपस्थित होते. निता सोळंके यांनी ह्यकाया मातीत मातीत...ह्ण हे कविता सादर केली. तसेच सायली पालीवाल, शुभांगी सोनवणे आणि इतर विद्यार्थ्यांनी बहिणाबाई चौधरींच्या कविता सादर केल्या.

प.वि.पाटील व झांबरे विद्यालयात बहिणाबाई यांना आदरांजली गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय व ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापक डी.व्ही. चौधरी यांच्या हस्ते बहिणाबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन गीत सादर करून बहिणाबाई यांना अभिवादन केले. यावेळी शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी, मुख्याध्यापिका रेखा पाटील, योगेश भालेराव, डी.ए. पाटील, देवेंद्र चौधरी, सरला पाटील आदी उपस्थित होते.अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाई बिग्रेडतर्फे निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर, ॲड. रवींद्र पाटील, आशा कोल्हे, प्रदीप भोळे आदीची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्रमात रवींद्र पाटील, सुनीता नारखेडे, कल्पिता पाटील, हर्षा बोरोले, खेमचंद महाजन, अखिलेश चौधरी, अशोक लाडवंजारी, हर्षल चौधरी, कार्तिक तळेले, धीरज पाटील, विवेक जावळे, सुरेश फालक, अविनाश भोळे, दर्शन भोळे, गौरव चौधरी, तेजस नारखेडे, सागर मराठे, हर्षल अटाळे आदींची उपस्थिती होती. आभार साधना लोखंडे यांनी मानले.सुजय महाजन प्राथमिक विद्यालयसुजय महाजन प्राथमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांची जयंती व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका ए.जी. सूर्यवंशी यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमात गौरव शिरसाठ, प्रतीक्षा भोलाणकर, काजल बंजारा, बजरंग तिवारी, रोहिणी सपकाळे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयमातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात शिक्षिका अर्चना धांडे यांच्याहस्ते दीपप्रज्वालन करून माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रततमेचे पूजन करण्यात आले. तर मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांनी आॅनलाईन पध्दतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. कृष्णा मराठे, पायल धाडी, संजय मिरचुले, सौरभ पाटील, प्रणाली, गायकवाड, दीपा गुप्ता, वैष्णवी निकुंभ, जयेश बाविस्कर, प्रशांत कवळे, स्वाती बाविस्कर, गायत्री कवळे, विजय बाविस्कर, रितेश शिरसाठ, मयूर शिरसाठ आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यशस्वीतेसाठी रूपाली वानखेडे, अर्चना धांडे, धनश्री फिरके, अविनाश महाजन, लीना नारखेडे, रोहिणी सोनवणे, नरेश कोळी, दीपक भोळे आदी उपस्थित होते.अखिल भारतीय लेवा विकास महासंघ अखिल भारतीय लेवा विकास महासंघ यांच्यातर्फे बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बहिणाबाई उद्यान येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी महापौर विष्णू भंगाळे, डॉ़ स्रेहल फेगडे, डॉ. राधेश्याम चौधरी यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. याप्रसंगी दीपक सुर्यवंशी, विशाल त्रिपाठी, ललित महाजन, महेंद्र पाटील, बिपीन झोपे, प्रा. सुरेश अत्तरदे, राजेश वारके, प्रा. डॉ. नीलेश पाटील, शैलेश काळे, राजू बढे, विक्की काळे, यतीन रोटे, भरत बेंडाळे, सचिन पाटील, नेमीचंद येवले, हरिष येवले, सचिन ढाके, सुनील बाविस्कर, राहुल चौधरी, नरेंद्र बोरसे, प्रफुल्ल सरोदे, सचिन महाजन, दीपक भारंबे, विजय नारखेडे आदींची उपस्थिती होती.सि. ग. भंगाळे माध्यमिक विद्यालयभंगाळे माध्यमिक विद्यालयात दीपनंदा पाटील यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आॅनलाईन कविता सादर केल्या़ यावेळी मुख्याध्यापक नरेंद्र बोरसे, प्रफुल्ल सरोदे, विजया चौधरी, अनुपमा कोल्हे, स्वाती पगारे, सचिन महाजन, दीपक भारंबे, विजय नारखेडे, प्रशांत भारंबे, भुषण भोळे आदींची उपस्थिती होती़बहिणाबाई माध्यमिक विद्यालयबहिणाबाई माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक त्र्यंबक शिवाजी चौधरी यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राम महाजन तसेच पद्माकर चौधरी, चंद्रकांत पाटील, शंकर चव्हाण, विलास नारखेडे, संतोष पाटील, राजेश वाणी, दिनेश चौधरी, विशाल पाटील, स्वाती कोल्हे, सीमा चौधरी, प्रतिभा राणे, संतोष सोनार, दुर्गादास कोल्हे, गोविंदा भोळे, जगदीश नेहते, नामदेव निकम आदींची उपस्थिती होती.खुबचंद सागरमल विद्यालय खुबचंद सागरमल विदयालयात पहिले राष्ट्रपती डॉ राजेद्र प्रसाद यांची जयंती व कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतीथी निमित्त प्रतिमेस मुख्याध्यापक सतिश साळुंखे यांच्या हस्ते मार्ल्यापण करण्यात आले. या प्रसंगी पर्यवेक्षक सुरेश आदिवाल, एल.एन. महाजन, भास्कर कोळी, विजय पवार,भास्कर कोळी, राजेश इंगळे, प्रवीण पाटील, राहुल देशमुख, सुलेमान तडवी, योगीनी बेंडाळे, करूणा महाले,सुनिता येवले आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव