अहो ताई ऐका, पाण्याचा वापर काटकसरीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:14 IST2021-04-26T04:14:20+5:302021-04-26T04:14:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाघूर पम्पिंग येथे नवीन पंप व उमाळा जलशुध्दीकरण केंद्रात नवीन व्हॉल्व बसविण्याचे काम हाती ...

Hey Tai, use water sparingly | अहो ताई ऐका, पाण्याचा वापर काटकसरीने करा

अहो ताई ऐका, पाण्याचा वापर काटकसरीने करा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वाघूर पम्पिंग येथे नवीन पंप व उमाळा जलशुध्दीकरण केंद्रात नवीन व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेण्‍यात आले असल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्‍यात आला आहे. त्यामुळे २६ एप्रिल रोजी होणारा पाणी पुरवठा हा २७ रोजी करण्‍यात येईल. तसेच २७ व २८ रोजीचा पाणी पुरवठा अनुक्रमे २८ व २९ रोजी करण्‍यात येणार आहे.

अमृत योजनेंतर्गत वाघूर पम्पिंग येथे ५०० अश्वशक्ती नवीन पंप बसविणे सुरू आहे, तर उमाळा जलशुध्दीकरण केंद्र येथील जुने व्हॉल्व काढून त्याठिकाणी नवीन व्हॉल्व बसविण्‍याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर १५०० मिमी जलवाहिनीवरील गळतीचे काम रविवारी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने हाती घेतले आहे. परिणामी, दुरूस्तीला वेळ लागणार असल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा हा एक दिवस पुढे ढकलण्‍यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मनपाकडून करण्‍यात आले आहे.

Web Title: Hey Tai, use water sparingly