शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

येथे माणुसकी ओशाळली... तो पेटत असताना नागरिकांची केवळ बघ्याची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 15:00 IST

तालुक्यातील कळमसरे येथील रामलाल वामन चौधरी (वय-५०) या इसमाने शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अंगावर पेट्रोल टाकून घेत पेटवून घेतले. ४४ अंश सेल्सीअस तापमानात हा इसम जळत असताना नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.

ठळक मुद्देभीतीपोटी नागरिकांनी टाकले नाही अंगावर पाणीजळीत इसमाची ओळख पटविण्यास आली सुरुवातीला अडचण१०८ रुग्णवाहिका अर्ध्या तासानंतरही आली नाही.

संजय पाटील/ आॅनलाईन लोकमतअमळनेर, जि.जळगाव, दि.२६ : तालुक्यातील कळमसरे येथील रामलाल वामन चौधरी (वय-५०,रा.माळीच गोराणे) या इसमाने शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अंगावर पेट्रोल टाकून घेत पेटवून घेतले. ४४ अंश सेल्सीअस तापमानात हा इसम जळत असताना नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. मदतीसाठी  १०८ रुग्णवाहिका बोलविल्यानंतर अर्धा तास झाल्यानंतरही ती न आल्याने या जळीताची तळमळ सुरु आहे.अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावाजवळ दुपारी २ वाजेच्या सुमारास एका ५० वर्षीय इसमाने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. ४४ अंश सेल्सीअस तापमान आणि त्यात शरीराने घेतलेला पेट यामुळे हा इसम वेदनेने आरडाओरड करायला लागला. पाहता पाहता ही घटना वाऱ्यासारखी पसरल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. कुणी मोबाईलमध्ये व्हीडिओ काढले तर कुणी फोटो. यासाºयात शरीराची आग विझविण्यासाठी मात्र कुणाकडूनही प्रयत्न झाले नाही. वेदना होत असल्याने हा इसम जमिनीवर लोटांगण घालू लागला. एका व्यक्तीने १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र तब्बल अर्धा तास होऊन देखील रुग्णवाहिका न पोहचल्याने हा इसम विव्हळत होता. जळीत इसमाकडे केवळ सायकल असल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. मात्र चौकशी केल्यानंतर रामलाल वामन चौधरी असे या इसमाचे नाव असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावfireआग