धुळपिंप्री येथील मयत शेतकऱ्याच्या वारसाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 18:58 IST2020-10-12T18:57:22+5:302020-10-12T18:58:14+5:30
धुळपिंप्री येथील आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या वारसाला शासनाकडून एक लाख रुपये मदत देण्यात आली.

धुळपिंप्री येथील मयत शेतकऱ्याच्या वारसाला मदत
पारोळा : तालुक्यातील धुळपिंप्री येथील आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या वारसाला शासनाकडून एक लाख रुपये मदत देण्यात आली.
सुधीर दगडू पाटील या शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. या शेतकºयाच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा म्हणून शासनाकडून एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील आढावा बैठकीदरम्यान ही मदत त्यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, पारोळा तहसीलदार अनिल गवांदे, एरंडोल तहसिलदार अर्चना खेतमाळीस, मधुकर पाटील आदी उपस्थित होते.