पूरग्रस्तांचा ‘पोळा’ गोड करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST2021-09-06T04:21:30+5:302021-09-06T04:21:30+5:30

रांजणगाव माध्यमिक विद्यालयात १९८२च्या एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपण ज्या गावात शिकलो त्या गाव परिसरात रांजणगाव बाणगाव ...

A helping hand of teachers and students to sweeten the ‘hive’ of flood victims | पूरग्रस्तांचा ‘पोळा’ गोड करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

पूरग्रस्तांचा ‘पोळा’ गोड करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

रांजणगाव माध्यमिक विद्यालयात १९८२च्या एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपण ज्या गावात शिकलो त्या गाव परिसरात रांजणगाव बाणगाव खेर्डे येथे महापुराच्या तडाख्याने अनेक कुटुंबीयांचे सर्वस्व हिरावले गेले आहे. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन किराणा सामानाचे ७५ किट तयार करून पूरग्रस्तांना घरोघरी जाऊन दिले. के. बी. चव्हाण, रवींद्र वाघ, पुरुषोत्तम वाणी, काशिराम जाधव, पत्रकार आर. डी. चौधरी, प्रा. के. के. अहिरे, नंदाराम सूर्यवंशी, राजेंद्र देवकर, संजय जगन्नाथ पाटे, निंबा वाघ, सादिक खाटीक उपस्थित होते.

चौकट

प्राध्यापकही मदतीला पुढे

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स, के. के. सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश बाविस्कर, प्रा. डॉ. अजय काटे यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वाकडी व बाणगाव येथील पूरग्रस्तांना ७५ किराणा किटचे वाटप केले. एन. सी. सी. आणि एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांच्या घरी जाऊन किटचे वितरण केले.

Web Title: A helping hand of teachers and students to sweeten the ‘hive’ of flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.