चाळीसगावात मदत, पुनर्वसन शिबिराला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:42+5:302021-09-05T04:20:42+5:30
जळगाव : चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ...

चाळीसगावात मदत, पुनर्वसन शिबिराला प्रारंभ
जळगाव : चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शिबिराला शनिवारपासून प्रारंभ झाला.
शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड चाळीसगाव संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, आमदार मंगेश चव्हाण, संस्थेचे सहसचिव संजय रतनसिंह, संस्थेचे संचालक सुधीर पाटील, अविनाश देशमुख, प्राचार्य डॉ. एस.आर. जाधव, उपप्राचार्य डॉ. एस.डी. महाजन, उपप्राचार्य प्रा. डॉ. यु.आर. मगर, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी.डी. देशमुख, प्रा. सुरेश कोळी इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कोरोनाचे संकट आणि अतिवृष्टीचे संकट यांना आपल्याला सामोरे जायचे आहे. स्वयंसेवक नक्कीच आपत्तीकाळात संकटग्रस्तांना मानसिक आधार देतील व सहकार्य करतील. त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ. संजय देशमुख यांनी उद्घाटनपर मनोगत केले. तर आपत्तीकाळात संकटग्रस्तांना आपत्तीतून बाहेर काढणे खूप मोठे आव्हान असते. हे आव्हान पेलण्याची क्षमता युवकांमध्ये असते, असे मत आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
यांनी घेतले परिश्रम
शिबिर यशस्वितेसाठी प्रा. डॉ. ए.एल. सूर्यवंशी, प्रा. डॉ. आर.पी. निकम, प्रा. मंगला सूर्यवंशी परिश्रम घेत आहेत. सूत्रसंचालन प्रा. डॉ. आर.पी. निकम यांनी तर आभार प्रा. मंगला सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.