सातगाव परिसरात पुन्हा मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:19 IST2021-09-24T04:19:52+5:302021-09-24T04:19:52+5:30
सातगावसह गहुले, तांडा, पिंप्री, सार्वे, वाडी, शेवाळे, शिंदाड, वडगाव कडे तसेच सोयगाव तालुक्यातील घोसला, तिडका, वनगाव, पहुरी, आदी गावांनाही ...

सातगाव परिसरात पुन्हा मुसळधार
सातगावसह गहुले, तांडा, पिंप्री, सार्वे, वाडी, शेवाळे, शिंदाड, वडगाव कडे तसेच सोयगाव तालुक्यातील घोसला, तिडका, वनगाव, पहुरी, आदी गावांनाही मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. खान्देशचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसाने पार धुळीस मिळवून टाकला आहे.
मान्सूनपूर्व पेरणी केलेल्या कपाशीचे पीक अक्षरश: सडून गेले असून, कपाशीची झाडेही आडवी झाली आहेत. एवढे मोठे नुकसान होऊनसुद्धा विमा कंपन्या विमा जाहीर करीत नाहीत, ही खेदाची बाब आहे, अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच पिकांचे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत, अशी आर्त हाक बळीराजाने दिली आहे.
अजूनही दोन- तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला असून, त्यानंतर महसूल विभाग आणि कृषी विभाग दोन्ही विभागांमार्फत नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून तसा अहवाल पाठवण्यात येईल.
- कैलास चावडे, तहसीलदार, पाचोरा