वळवाच्या पावसाची यावल तालुक्यात हजेरी
By Admin | Updated: May 7, 2017 18:38 IST2017-05-07T18:38:21+5:302017-05-07T18:38:21+5:30
यावल तालुक्यातील किनगाव-चिंचोली परीसरात रविवारी सायंकाळी वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला़

वळवाच्या पावसाची यावल तालुक्यात हजेरी
यावल,दि.7- तालुक्यातील किनगाव-चिंचोली परीसरात रविवारी सायंकाळी वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला़ सुदैवाने कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही़
प्रचंड वा:याच्या वेगासह रविवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली़ दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला़ रविवारी दुपारी चार वाजेपासून तालुक्यातील वातावरणात अचानक बदल झाला. ढगांच्या गडगडाटासह चिंचोली, किनगाव, नायगाव, चुंचाळे परीसरात जोरदार वळवाच्या पावसाने हजेरी दिली़
वड्री येथेही पाऊस झाला तर दहीगाव येथे तुरळक सरी कोसळल्या़ यावल व पुर्व भागात कोठेही पावसाचे अथवा वादळाचे वृत्त नाही. यावल शहरासह परीसरात रात्रीर्पयत पावसाचे वातावरण कायम होते.
दरम्यान, भुसावळसह बोदवड, मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात सायंकाळी उशिरा पावसाचे वातावरण झाले मात्र पावसाने हजेरी लावली नाही़