भुसावळात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 18:24 IST2017-09-14T18:23:23+5:302017-09-14T18:24:14+5:30
वेल्हाळे येथे वीज पडून चार म्हशींसह बैलजोडी, बकरी ठार

भुसावळात मुसळधार पाऊस
ऑनलाईन लोकमत
भुसावळ : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भुसावळ आणि यावल येथे गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथे वीज पडल्याने गोठय़ातील चार म्हशी, बैलजोडीसह बकरी ठार झाली. भुसावळ विभागात गुरुवारी अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. या परिसरात सुमारे 40 मिनिटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. काही ठिकाणी गुडघाभर पाणी रस्त्यावर साचल्याने रहदारी ही मंदावली होती. वीज पडून चार म्हशी, बैल जोडीसह बकरी ठार भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथील जि.प. शाळेमागील राजेंद्र व्यंकट पाटील यांच्या गोठय़ाजवळील वीज तारेवर वीज पडली. वीज प्रवाह असलेली वीज वाहिनीची तार म्हशीसह बैलजोडीवर पडली.त्यामुळे शॉक लागून चार म्हशी ठार झाल्या तर शेजारील गोठय़ातील कैलास सुभाष चौधरी यांची बैलजोडी व प्रशांत बाळकृष्ण पाटील यांची बकरी ठार झाली.