लॉर्ड्सवर जोरदार पाऊस अन् जेवणाची लज्जत भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:51+5:302021-08-13T04:21:51+5:30
मरीन यांनी सोडला भारत नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोर्ड मरीन यांनी गुरुवारी भारत सोडला आहे.ते ...

लॉर्ड्सवर जोरदार पाऊस अन् जेवणाची लज्जत भारी
मरीन यांनी सोडला भारत
नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक शोर्ड मरीन यांनी गुरुवारी भारत सोडला आहे.ते मायदेशी रवाना झाले. त्याबाबत ट्विट करून त्याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, आज भारत सोडत आहे. भारत हा कायमच माझ्या हृदयात राहील. लवकरच भेटू.
आयसीसी झोपेत आहे का? - इंझमाम
नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार इंझमाम उल हक हा आयसीसीवर चांगलाच संतापला आहे. न्यूझीलंडने त्यांच्या मुख्य खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी दिली. त्यामुळे बहुतेक खेळाडू पाकिस्तानविरोधातील मालिकेतून बाहेर पडतील. त्यामुळे इंझमामने म्हटले की, मला वाटते की पाकिस्तानला फारसा सराव करण्याची गरज नाही. कारण ते मुख्य खेळाडूंच्या विरोधात खेळणार नाहीच. आयसीसी काय करत आहे? ते नेमका काय संदेश देत आहेत.