जळगाव: जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात सोमवार सकाळपासून जोरदार पाऊस पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावणार आहे.
जिल्ह्यातील जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव तालुक्यात काही ठिकाणी रविवारी रात्रीपासून तर काही ठिकाणी सोमवारी सकाळपासून पाऊस सुरू आहे. पाचोरा तालुक्यात तर गेल्या चार तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नगरदेवळा ता. पाचोरा परिसरात सकाळच्या सव्वाआठ-साडेआठ वाजेच्या सुमारासही अंधार पडल्यासारखी स्थिती होती. विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे अग्नावती नदीला मोठा पूर आला आहे.
सावधानतेचा इशारा
पाचोरा तालुक्यात सोमवारी रात्रीपासून जोरात पाऊस सुरू आहे. यामुळे तालुक्यातील बहुळा, हिवरा व अग्नावती मध्यम प्रकल्प तसेचम्हसाळा(कोकडी) सर्वेपिंप्री, सातगाव गहुला, पिंपळगाव कोल्हे, सार्वा-खाजोळा, बदरखा, गाळण, तारखेडा, कळमसरा हे लघु प्रकल्प पूर्ण भरले आहेत व त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.