भुसावळात वळवाच्या पावसाची दमदार हजेरी
By Admin | Updated: May 23, 2017 17:51 IST2017-05-23T17:51:25+5:302017-05-23T17:51:25+5:30
भुसावळ परिसरात मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी दिली़
भुसावळात वळवाच्या पावसाची दमदार हजेरी
ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.23 - शहरासह परिसरात मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी दिली़
सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या पावसामुळे शहरात जागोजागी पाणी साचले. तर उकाडय़ाने हैराण झालेल्या जनतेला वातावरण अचानक गारवा निर्माण झाल्याने दिलासाही मिळाला़ वीज कंपनीने तातडीने वीजपुरवठा खंडित केला़ शहरातील बसस्थानकासह शासकीय विश्रामगृह परीसरात पाणी साचले होते. पावसाळ्याला 7 जून पासून प्रारंभ होणार असलातरी मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी दिल्याने शहरातील गटारी ओसंडून वाहत असल्याचे चित्रही पहायला मिळाल़े