चोपडा तालुक्यात दमदार पाऊस, गारपीट

By Admin | Updated: June 2, 2017 17:54 IST2017-06-02T16:54:19+5:302017-06-02T17:54:18+5:30

वातावरणात गारवा : पावसात भिजण्याचा आनंद

Heavy rain, hail in Chopda taluka | चोपडा तालुक्यात दमदार पाऊस, गारपीट

चोपडा तालुक्यात दमदार पाऊस, गारपीट

 ऑनलाईन लोकमत

चोपडा,दि.2 : शहरासह  तालुक्यात शुक्रवारी दुपारी वादळी वारा पाऊस झाला. चहार्डी येथे गारपीट झाली. 
येथे आज दुपारी साडेतीन वाजेनंतर पावसाचे वातावरण झाले. सोबत वादळी वारा होते. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरवात झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास पाऊस झाल्याने, वातावरणात गारवा निर्माण झाला होता. लहान बालकांनी पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला. या पावसाचा धूळपेरणी केलेल्या शेतक:यांचा फायदा होणार आहे. 
चहार्डी येथे सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गारपीट झाली. सुपारीच्या आकारा एवढी ही गारपीट होती. 
अमळनेरात ढगाळ वातावरण
दरम्यान अमळनेरात सायंकाळी चार वाजेर्पयत ढगाळ वातावरण होते. सोसाटय़ाचा वाराही सुटला होता. मात्र पाऊस बरसला नाही.

Web Title: Heavy rain, hail in Chopda taluka