शहरात पावसाची जोरदार बॅटिंग...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST2021-09-08T04:22:59+5:302021-09-08T04:22:59+5:30
जळगाव : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर मंगळवारी सकाळपासून कायम होता. सकाळच्या सुमारास असलेल्या हलक्या ...

शहरात पावसाची जोरदार बॅटिंग...
जळगाव : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर मंगळवारी सकाळपासून कायम होता. सकाळच्या सुमारास असलेल्या हलक्या स्वरूपाच्या पावसाने दुपारी व संध्याकाळी जोरदार बॅटिंग करीत जळगाव शहराला अक्षरश: झोडपून काढले. दुपारी आलेल्या पावसामुळे जळगावकरांची चांगलीच धांदल उडाली होती.
शनिवारी रात्री शहरासह तालुक्यात धुवाधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पावसाचे प्रचंड पाणी साचले होते. परिणामी, अनेकांना घराबाहेर पडण्यासाठी पाण्यातून वाट काढावी लागत होती. त्यातच मंगळवारीसुद्धा सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. सकाळी नऊ वाजेनंतर शहरातील काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. नंतर हवेतील आर्द्रता वाढल्याने दुपारी पावसाचे आगमन झाले. शहर आणि उपनगरातही पावसाने हजेरी लावली. तासभर झालेल्या धुवाधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. शिवाजीनगर, खंडेरावनगर, पिंप्राळा-हुडको रोडसह गल्लीबोळांमध्ये पावसामुळे प्रचंड चिखल झाला होता. या चिखलातून वाट काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.