शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा हीट अँड रन; भरधाव कारची दुचाकीला धडक, कारचालक पसार

By विजय.सैतवाल | Updated: July 1, 2024 00:25 IST

दरम्यान, दीड महिन्यापूर्वीच भरधाव कारच्या धडकेत रामदेववाडी जवळ चौघांना जीव गमवावा लागण्याची घटना घडल्यानंतरही असे अपघात सुरूच आहे.

जळगाव : दुचाकीवरुन घरी जात असलेले गणेश बळीराम बाक्षे (६३, रा. पार्वतीकाळे नगर) यांना भरधाव कारने धडक देत कारचालक पसार झाला. या अपघातात वृद्ध गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री मोहाडी रोड ते राकेश नगर दरम्यान घडली. जखमी बाक्षे यांच्या नाक व कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, दीड महिन्यापूर्वीच भरधाव कारच्या धडकेत रामदेववाडी जवळ चौघांना जीव गमवावा लागण्याची घटना घडल्यानंतरही असे अपघात सुरूच आहे.

खाजगी कंपनीतून निवृत्त झालेले गणेश बाक्षे हे रविवारी सायंकाळी  दुचाकीने घरी परतत होते. घरापासून अवघ्या काही अंतरावर असताना मोहाडीकडून राकेशनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना मागून भरधाव  कारने धडक दिली. यामध्ये बाक्षे हे दुचाकीवरुन खाली कोसळल्याने त्यांच्या हातापायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांच्या कानातून आणि नाकातून रक्तस्त्राव होवू लागला.  त्या परिसरात राहणारे दीपक परदेशी यांच्यासह नागरिकांनी  घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वृद्ध बाक्षे यांच्या मोबाईलमधील क्रमांकावरुन त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली.त्यावेळी बाक्षे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी  गणेश बाक्षे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.  त्यांच्या फुफुसाला देखील मार लागला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सिटीस्कॅन करण्यास सांगितले असून त्यांच्यावर याठिकाणी उपचार सुरु आहेत.

कारमध्ये तरुणमोहाडीकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारमध्ये तरुण असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. वृद्धाला धडक दिल्यानंतर हे तरुण तेथे न थांबता पसार झाले. याप्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

टॅग्स :Accidentअपघातcarकार