कानबाई मातेला भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:22 IST2021-08-17T04:22:49+5:302021-08-17T04:22:49+5:30
नशिराबाद : सुखसमृद्धीची प्रार्थना व कुलदेवीचा जयघोष करीत तसेच भक्तीमय वातावरणात कानबाई मातेला सोमवारी पारंपरिकरीत्या निरोप देऊन विसर्जन ...

कानबाई मातेला भावपूर्ण निरोप
नशिराबाद : सुखसमृद्धीची प्रार्थना व कुलदेवीचा जयघोष करीत तसेच भक्तीमय वातावरणात कानबाई मातेला सोमवारी पारंपरिकरीत्या निरोप देऊन विसर्जन करण्यात आले. ईडा पिडा टळुदे, सुखसमृद्धी भरभराटीसह शेतात विपुल धान्य पिकू दे अशी प्रार्थना कानबाई मातेला करण्यात आली.
रविवारी कानबाई मातेची विधिवत स्थापना घरोघरी करण्यात आली होती. रोटाचा महाप्रसाद ग्रहण करून घरोघरी देवीच्या समोर जागरणाचा कार्यक्रम झाला. सोमवारी पारंपरिक पद्धतीने दहीभात, कानोले यांचा नैवेद्य अर्पण करून दुपारी देवीचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. त्यानिमित्त कानबाई मातेचा चौरंग डोक्यावर घेत महिलांनी घरातच मिरवणूक काढली तर काहींनी घरापासून विहिरीपर्यंत मिरवणूक काढत पारंपारिक पद्धतीने आरती करून विसर्जन केले. याप्रसंगी महिलांनी कानबाईचे गाणे म्हटले व निरोप दिला.