आरोग्य क्षेत्राला बळकटी मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST2021-02-05T05:54:19+5:302021-02-05T05:54:19+5:30
- डॉ. महेंद्र काबरा. औषधांवरील जीएसटीचा विचार नाही आरोग्य क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींचा मोठा फायदा होणार आहे. औषधांवरील जीएसटीचा भार ...

आरोग्य क्षेत्राला बळकटी मिळेल
- डॉ. महेंद्र काबरा.
औषधांवरील जीएसटीचा विचार नाही
आरोग्य क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींचा मोठा फायदा होणार आहे. औषधांवरील जीएसटीचा भार कमी होण्याची अपेक्षा होती, मात्र तो झाला नाही. जीएसटी शून्य केल्यास औषधे स्वस्त होतील. आरोग्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात केलेल्या मोठ्या तरतुदींमुळे आरोग्य क्षेत्राच्या बळकटीकरणास चालना मिळेल.
- सुनील भंगाळे.
करांमध्ये सूट नाही
आरोग्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या तरतुदी आहे. मात्र, औषध विक्रेत्यांना करामध्ये सूट मिळण्याची अपेक्षा होती, ती मात्र पूर्ण झाली नाही. शिवाय १८ टक्के जीएसटी असल्याने ती पाच टक्क्यांवर आणण्याची मागणी होती, तीदेखील मान्य झालेली नाही. मात्र एकूण अर्थसंकल्प चांगला आहे.
- अनिल झंवर.
टेक्सटाईल्स पार्कचा लाभ होण्याची अपेक्षा
अर्थसंकल्पात सात टेक्सटाईल्स पार्क व यातील दोन महाराष्ट्रात होणार असल्याची घोषणा झाली आहे. प्रत्यक्षात त्या उभारल्या गेल्या तर त्याचा कापड उद्योगाला मोठा लाभ होईल. दुसरीकडे मात्र करांच्या बाबतीत निराशा झाली आहे. प्राप्तिकर रचनेची मर्यादा वाढविण्याची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही.
- सुरेश हासवाणी
भांडवल उपलब्ध होऊन बाजाराला ‘बूस्ट’
२० ते २५ वर्षांत एवढा चांगला व सुटसुटीत अर्थसंकल्प पाहिलेला नाही. कोरोनाकाळात सरकारने मोठा खर्च केला, मात्र त्याचा भार आता जनतेवर येऊ दिलेला नाही. पायाभूत सुविधा ३४ टक्क्यांनी वाढविल्याने यामुळे भांडवल वाढून बाजारपेठेला चालना मिळणार आहे. जीएसटीमध्ये १ ऑक्टोबरपासून ४०० तरतुदी बदलणार असल्याची घोषणा केल्याने त्याचाही लाभ होणार आहे.
- पुरुषोत्तम टावरी.
‘आत्मनिर्भर भारत’ला बळ
कोरोनाचे सावट व मंदावलेली अर्थव्यवस्था यामुळे वाढीव कर लावला जाईल, अशी सर्वांनाच भीती होती. मात्र अर्थसंकल्पात वाढीव कर लावण्यात आली नाही. सोबतच कररचनेतही कोणताही बदल केलेला नाही. यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच परवडणाऱ्या घरांसाठीच्या धोरणात तरतूद वाढविल्याने घर स्वस्त होण्याचा उद्देश साध्य होऊ शकणार आहे. आयात शुल्क वाढविल्याने मोबाईल व इतर घटक महागणार असे वाटत असले तरी देशातील मोबाईल व इतर कंपन्यांना यामुळे चालना मिळून खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत योजनेला बळ मिळू शकेल.
- सागर पाटणी.
या अर्थसंकल्पात काही क्षेत्रांसाठी थेट लाभ दिला गेला नसला तरी अपेक्षेप्रमाणे पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. यामुळे बाजारपेठेत खेळता पैसा राहून सर्वच क्षेत्राला लाभ होईल. करांच्या बाबतीत सर्वांना दिलासा राहणार असून सर्व समावेशक अर्थसंकल्प आहे.
- प्रशांत अग्रवाल.
ठळक मुद्दे
बांधकाम क्षेत्राला उद्योगाच्या दर्जाची प्रतीक्षा कायम
राज्यात होणाऱ्या दोन टेक्सटाईल्स पार्कचा होणार लाभ
कोरोनामुळे असलेली वाढीव कराची भीती टळली
घर स्वस्त होण्याचा उद्देश होणार साध्य
छोट्या करदात्यांच्या सेटलमेंटला गती देण्यासाठी पॅनल
ज्येष्ठांना प्राप्तीकर परताव्यापासून मुक्ती
जीडीपीमध्ये वाढ होण्यासाठी सकारात्मक पाऊल
कमी व्याज दरात उद्योगांना कर्ज, यामुळे बँकानाही लाभ
रोजगारवाढीची अपेक्षा, मात्र मनरेगाचा अर्थसंकल्पात कोठेही उल्लेख नाही.