आदिवासी भागात आरोग्य अधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST2021-06-22T04:11:41+5:302021-06-22T04:11:41+5:30

यावेळी अधिकाऱ्यांनी अंगणवाडी केंद्रातील कुपोषित बालकांची व गरोदर मातांची विचारपूस केली. उपकेंद्रातच महिलांची प्रसूती व्हायला हवी ...

Health officials visit tribal areas | आदिवासी भागात आरोग्य अधिकाऱ्यांची भेट

आदिवासी भागात आरोग्य अधिकाऱ्यांची भेट

यावेळी अधिकाऱ्यांनी अंगणवाडी केंद्रातील कुपोषित बालकांची व गरोदर मातांची विचारपूस केली. उपकेंद्रातच महिलांची प्रसूती व्हायला हवी आशा सूचना आरोग्य सेविकांना देण्यात आल्या. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी सुरक्षा योजना व इतर प्रकारचे आर्थिक लाभ लवकरात लवकर कसे दिले जातील, याचे नियोजन करण्यास सांगितले. तसेच अतिदुर्गम व आदिवासी भागात सावखेडासीम प्रा. आ. केंद्राकडून दिल्या जात असलेल्या आरोग्य सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.

कोरोना प्रतिबंधक लसीबाबत असलेले गैरसमज दूर करून लसीकरण करून घेण्याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी ता. आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, मानसेवी अधिकारी डॉ. प्रवीण ठाकरे, आरोग्य सेवक अरविंद जाधव, आरोग्य सेविका शाबजान तडवी, शिवप्रताप घारू, समीर तडवी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Health officials visit tribal areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.