रोटरी क्लब ऑफ स्टार्सतर्फे पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांना आरोग्य किट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST2021-05-05T04:26:29+5:302021-05-05T04:26:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना काळात पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन २४ तास दक्ष असून, प्रत्येक रस्त्यावर, ...

Health kits distributed to police and municipal employees by Rotary Club of Stars | रोटरी क्लब ऑफ स्टार्सतर्फे पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांना आरोग्य किट वाटप

रोटरी क्लब ऑफ स्टार्सतर्फे पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांना आरोग्य किट वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना काळात पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन २४ तास दक्ष असून, प्रत्येक रस्त्यावर, गल्लीत, उभे राहून शक्य असलेली उपाय योजना करून उद्भवलेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. या कोरोना योद्ध्यांना रोटरी क्लब ऑफ स्टार्सतर्फे सॅनिटायझर, मास्क व सी व्हिटॅमिनच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

क्लबतर्फे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे व महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक असलेले सी झेड व्हिटॅमिनच्या टॅबलेट, सॅनिटायझर व मास्कचे ९०० किट बनवून शहरातील सर्व पोलीस स्टेशन व पाळधी येथील पोलीस स्टेशन मधील संपूर्ण पोलिसांना वाटण्यात आले. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना देखील याचे वाटप करण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष धनराज कासट, आयपीपी सागर मुंदडा, जिनल जैन, चंदन तोष्णीवाल, हर्षल कटारिया, हितेश सुराणा, करण ललवाणी, रोहित आहुजा यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Health kits distributed to police and municipal employees by Rotary Club of Stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.