करमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST2021-09-17T04:20:15+5:302021-09-17T04:20:15+5:30
पारोळा : तालुक्यातील करमाड बुद्रुक व करमाड खुर्द या गावांना आमदार चिमणराव पाटील यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी ...

करमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर
पारोळा : तालुक्यातील करमाड बुद्रुक व करमाड खुर्द या गावांना आमदार चिमणराव पाटील यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. स्व. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डाॕॅ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यातर्फे झालेल्या शिबिरात ७५० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांनी केले. यावेळी करमाड खुर्द येथे ४५० तर करमाड बुद्रुक येथे ३०० रुग्णांची तपासणी झाली.
याप्रसंगी माजी सरपंच त्र्यंबक पाटील, गुलाब पवार, सेवानिवृत्त शिक्षक नामदेव पाटील, करमाड विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एम.पाटील, उपसरपंच शरद पवार, सदस्य गोपाल पाटील, हेमंत पाटील, समाधान पाटील, सुकदेव पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक हरिचंद्र निकम, मनोहर पाटील, करमाड बुद्रुक सरपंच सुशील पाटील, शालेय समिती अध्यक्ष प्रवीण पाटील, माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारीवृंद, वैद्यकीय सेवेसाठी धनंजय पाटील, संगीता पाटील, राकेश शिंपी, नितीन साळी, सागर पाटील, गिरीश पाटील, भाईदास ठाकरे आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.