एरंडोल येथे आरोग्य व कायदेविषयक कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:52+5:302021-09-09T04:22:52+5:30
एरंडोल : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघ एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व ...

एरंडोल येथे आरोग्य व कायदेविषयक कार्यशाळा
एरंडोल : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघ एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रभारी कुलगुरू बी. व्ही. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, माजी अध्यक्ष देवीदास महाजन, डी. टी. चौधरी, तहसीलदार सुचिता चव्हाण, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सुभाष पवार आदी उपस्थित होते. शिक्षक दिनाचे औचित्य साधत या वेळी प्रा. शिवाजीराव अहिरराव, पी. जी. चौधरी, व्ही. जी. पाटील, रघुनाथ कोठावदे, मधुकर रघुवंशी यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा. अशोक पवार (अमळनेर), बळीराम हिरे, डॉ. राहुल वाघ, डॉ. स्नेहल पाटील, डॉ. राहुल पाटील यांनी आरोग्य व कायदेविषयक सविस्तर विवेचन केले. सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अरुण माळी यांनी प्रास्ताविक केले.