जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST2021-05-05T04:26:44+5:302021-05-05T04:26:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २४ हजार ६४६ जण कोरोनाबाधित झाले होते. त्यातील १ ...

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २४ हजार ६४६ जण कोरोनाबाधित झाले होते. त्यातील १ लाख १२ हजार ३५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यासोबतच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण हे ९०.१४ टक्के एवढे झाले असून, ही बाब दिलासादायक असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी प्रशासनाने राबविलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान व इतर उपाययोजनांमुळे जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के पेक्षा जास्त होते. नंतरच्या काळात १० फेब्रुवारीपासून हे प्रमाण कमी झाले होते. तर ३१ मार्च रोजी बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात ८४.९२ टक्के एवढे खाली आले होते. नंतर ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेत बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील, तसेच संशयित रुग्ण शोध मोहिमेंतर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचण्या वाढविल्या होत्या. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांच्यावर वेळेत उपचार होत असल्याने, आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत ६,६१९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी १ हजार ३३८ रुग्णांना ऑक्सिजन सुरू असून, ७६३ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
आजपर्यंत केलेल्या एकुण चाचण्या
९ लाख ४८ हजार ७०८
पॉझिटिव्ह रुग्ण
१ लाख २४ हजार ६४६
बरे झालेले
१ लाख १२ हजार ३५६