‘त्या’ बच्चे कंपनीच्या म्होरक्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST2021-08-26T04:19:43+5:302021-08-26T04:19:43+5:30

याआधी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पकडले होते, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना अटक करता येत नसल्याने पालकांच्या स्वाधीन करण्यात आले ...

The head of 'that' children's company was arrested | ‘त्या’ बच्चे कंपनीच्या म्होरक्याला अटक

‘त्या’ बच्चे कंपनीच्या म्होरक्याला अटक

याआधी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पकडले होते, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना अटक करता येत नसल्याने पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते. ईस्माईल हा फरार होता.

पिंप्राळा परिसरातील तलाठी ऑफिसजवळ वास्तव्याला असलेले काशिनाथ रामजी ठाकूर (वय ८४ ) यांच्या मालकीची पानटपरी याच परिसरात भवानी मंदिराच्या मागील बाजूस आहे. १४ ऑगस्ट रोजी ठाकूर हे सकाळी पानटपरी उघडण्यास आले असता, टपरीच्या मागील बाजूचा पत्रा कापून चोरट्यांनी पानटपरीतील ६ हजार ९०० रुपयांचे सिगारेट, २ हजार रुपयांची तंबाखू, २ हजार ५०० रुपयांचा पान मसाला व दहा हजार रुपये रोख असा एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचे समोर आले. याप्रकरणी ठाकूर यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली होती. दरम्यान, गेल्या आठ वर्षांत चोरट्यांनी तिसऱ्यांदा ही पानटपरी फोडल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या घटनेत १६ हजार रुपये तर दुसऱ्या घटनेत २ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. यावेळी तिसऱ्या या घटनेत २७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या घटनेत आधी पोलिसांनी तीन अल्पवयीन संशयितांना अटक केली आहे.

चोरीचा मुद्देमाल विक्रीवरून गवसला संशयित

गुन्ह्याच्या तपासात चोरट्यांनी चोरलेला माल पिंप्राळा हुडको परिसरात एका जणाला विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित ईस्माईल शेख सय्यद यास अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहेत.

Web Title: The head of 'that' children's company was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.