चवीने पिणार त्याला हवी तसे मिळणार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 04:53 PM2017-12-18T16:53:40+5:302017-12-18T16:55:01+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘चहा’ या सदरात साहित्यिक डॉ.अलका शशांक कुलकर्णी यांनी ‘चहा’चा घेतलेला आढावा.

He will taste it as he wants. | चवीने पिणार त्याला हवी तसे मिळणार..

चवीने पिणार त्याला हवी तसे मिळणार..

Next

लु यु याने लिहून ठेवले ते खरे आहे. हजारो प्रकारचे चहा आहेत. ह्या इतक्या प्रकारातून नेमकी कुठली चहापत्ती कुठल्या चहात असते? बाजारात चहा येण्यापूर्वी त्याला आणखी एक परीक्षा पार पाडावी लागते ती म्हणजे चवीची. हे ‘टी टेस्टर’चे काम चहाची चव घेऊन त्याची प्रत ठरवणारा हा आसामी दिग्गज कलाकार असतो. रोज किमान अडीचशे प्रकारच्या चहाची चव घेणे आणि दोन अडीच हजार प्रकारच्या चहा चवींची आठवण ठेवणे किती कठीण काम! बाजारात मिळणारे काही चहा महाग, ‘सिंगल इस्टेट’ अर्थात एकाच बागेतले असतात तर सर्वसाधारण चहा अनेक प्रकारच्या चहापत्तींच्या मिश्रणातून बनवले जातात. काळा, हिरवा आणि उलोंग हे नेहमीचे चहा आणि ‘सिल्वर निडल्स‘सारखे दुर्मीळ. या सर्वांची त्याची जानपेहचान असते. एक प्रसिद्ध चहा आहे यात संत्र्याचा काहीएक संबंध नसून, डच घराण्यापासून त्याची व्युत्पत्ती आहे. पिको हा चिनी ‘पाई हो’ शब्दाचा अपभ्रंश. हा चहा त्याच्या गंध आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे. भारतात मिळणारा हा चहा फार महागही नाहीये. आणखी एक भारी चिनी चहा. भारतीय ‘रंगली रंगलीओत’ या पलीकडे चांगला चहा नाही. जपानी लोकांचा सर्वसाधारण चहा. ‘टेस्टिंग रूम’ ही मंदिरासारखी स्वच्छ आणि पवित्र समजली जाते. मागच्या रांगेत वेगवेगळ्या चहाचे डबे हारीने मांडलेले, पुढची रांग इवलाशा किटल्यांची तर सर्वात पुढे टेस्टिंगचे वाडगे. चहासाठी पाणी घ्यायचे तेही डिस्टील केलेले, आधीची कसलीही चव नसलेले. पाण्याला उकळी फुटली रे फुटली की ते चहापत्तीवर ओतायचे आणि बरोबर चार मिनिटे चहा मुरू द्यायचा. आता कठीण परीक्षा सुरू होते. गाळलेल्या चहाची पत्ती आता कशी दिसते हेही महत्त्वाचे. ‘टेस्टर’ एकेक चहा पीत त्याला मार्कही देतो आणि कुठली पत्ती कुठल्या दुस:या पत्तीत मिसळायची तेही ठरवतो. जीभ आणि नाक दोन्हींचा उपयोग स्वाद घेण्यासाठी करावा लागतो. केनिया देशात ‘इलेक्ट्रोनिक नाक’ वापरायचे प्रय} झाले, पण व्यर्थ! एक चव घेतली की स्वच्छ चूळ भरून (त्यासाठी पिकदाणी हजर असतेच’ पुढच्या चहापत्तीकडे वळायचे! प्रत्येक चहापत्तीबद्दल टेस्टर ताबडतोब आपले मत नोंदवून ठेवतो. येथेही चार पाच टेस्टरांची मते नोंदवून शेवटी एकदाचे कुठल्या चहापत्तीचे कशात मिश्रण करायचे हे ठरते. काही उत्तम चहा मिश्रण न केलेले, ‘सिंगल इस्टेट’ (महाग) चहा असतात. आज मात्र चहाचे दर्दी हळहळतात की रीतसर चहा करण्याइतका वेळ लोकांना नसतो. ते सर्रास ‘टी बॅग’ वापरतात. 1903 साली थॉमस सलीवॅन या अमेरिकन चहा व्यापा:याने खर्च कमी करायचा ठरवला. त्याच्या चहाचे नमुने त्याने डब्यांऐवजी रेशमी पुडय़ांतून इतर व्यापा:यांना पाठवले. आतील चहापत्ती बाहेर काढण्याऐवजी लोकांनी अख्खी पुडीच उकळत्या पाण्यात टाकायला सुरुवात केली आणि ‘टी बॅग’चा जन्म झाला, ज्यात हलकी पत्ती खपवता येते! आपण किती सहजपणे चहा पितो! कपाकपामागे असीम कष्टांचा, दु:खाचा, स्वार्थाचा इतिहास असेल हे आपल्याला माहीतही नसते.

Web Title: He will taste it as he wants.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.