`त्या` एटीएमप्रकरणी मनपाकडून खुलासा मागविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:12 IST2020-12-09T04:12:07+5:302020-12-09T04:12:07+5:30
बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्यातील फरार असलेला मुख्य आरोपी सुनिल झंवर याचे जळगाव मनपाचा साफसफाईचा ठेका घेतलेल्या वॉटरग्रेसमध्येही भागीदारी असल्याचा आरोप ...

`त्या` एटीएमप्रकरणी मनपाकडून खुलासा मागविणार
बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्यातील फरार असलेला मुख्य आरोपी सुनिल झंवर याचे जळगाव मनपाचा साफसफाईचा ठेका घेतलेल्या वॉटरग्रेसमध्येही भागीदारी असल्याचा आरोप होत आहे. वॉटरग्रेसकडून ठेकेेदारीवर काम करणाऱ्या सफाई कामगारांना थेट बँकेमार्फत त्यांच्या खात्यावर वेतन जमा करण्यात येते. त्यानंतर सफाई कामगार आपल्या पद्धतीने एटीएम मधुन किंवा बँकेत जाऊन रोखीने पगार काढतात. असे असतांना या सफाई कामगारांचे एटीएम सुनिल झंवर यांच्या कार्यालयात सापडल्याने, हे एटीएम या ठिकाणी आले कसे, हे एटीएम कामगारांनी सुनिल झंवर याच्याकडे ठेवायला दिले की झंवरने या कामगारांकडुन ताब्यात घेतले आहेत, कामगारांचे एटीएम जप्त करण्याचा उद्देश काय, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
या प्रकरणी मनपाला पत्र पाठवून, कामगारांचे एटीएम झवरच्या कार्यालयात कसे सापडले, या प्रकरणी मनपा आयुक्तांकडून खुलासा मागविणार आहेत. दरम्यान, या एटीएमबाबत कुठल्याही कामगाराने आपल्याकडे तक्रार केली नसल्याचेही बिरार यांनी सांगितले.